श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट, नाशिक (महा.), आयोजित
जागतिक कृषी महोत्सव २०१७
संस्कृती | साहित्य | प्रदर्शन

२५ ते २९ जानेवारी २०१७

जागतिक कृषी महोत्सव २०१७ विषयी

उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी – गुरुमाऊली प. पू. आण्णासाहेब मोरे

“जागतिक कृषी महोत्सवाचे” वैशिष्ट्य म्हणजे हा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कृषी विकासासाठी आयोजित केलेला एकमेव कृषी महोत्सव आहे. म्हणूनच या कृषीमहोत्सवास विनामुल्य प्रवेश दिला जातो.दरवर्षी होणाऱ्या या जागतिक कृषी महोत्सवाचा लाभ आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी घेतला आहे. तसेच याद्वारे कृषी तज्ञ, सेवाभावी संस्था, प्रयोगशील शेतकरी व विद्यार्थी यांना उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. गरीब व श्रीमंत शेतकऱ्यांमधील दरी दूर करून सांप्रत कृषी क्षेत्रात वाढत असलेली सामाजिक विषमता दूर करून कृषी विभाग स्वावलंबी व विकसित होऊन जन-माणसात कृषी क्षेत्राविषयी आवड निर्माण करणे तसेच प्रत्येक शेतकरी हा स्वावलंबी व्हावा , तसेच कृषी विभाग विकसित व्हावा, नवीन तंत्रज्ञान व सेंद्रिय , नैसर्गिक शेतीविषयी ज्ञान त्यांच्या पर्यंत पोहोचावे हा कृषी महोत्सव आयोजनाचा मूळ उद्देश आहे. यंदाच्या कृषी महोत्सवात राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, भारत व कृषी संस्कृती प्रदर्शन, पशुधन व गोवंश प्रदर्शन, दुर्मिळ वनऔषधी व आरोग्य प्रदर्शन इ.चा समावेश आहे. तसेच या महोत्सवात नाविन्यपुर्ण आणि अधोरेखित करण्याजोगी बाब म्हणजे “प्राचीन भारतीय कृषी विज्ञान” होय. या सोबतच कृषीमहोत्सवामध्ये सरपंच मांदियाळी, बारा बलुतेदारांचे स्वयंपूर्ण गाव, कृषी वास्तूशास्त्रानुसार आदर्श शेती मॉडेल, दुर्मिळ रानभाज्यांचे प्रदर्शन, आठवडे बाजार, धान्य महोत्सव, शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री, कृषी प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम, आशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. कृषी महोत्सवासाठी देश-विदेशातील सेवेकरी, शेतकरी, कृषी तज्ञ, पर्यावरण तज्ञ, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, कृषी अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी, शेती व बिगरशेती व्यावसायिक, गृहिणी यांचा लाखोंच्या संख्येने सहभाग नोंदविला जातो.

या ज्ञानदानाच्या पर्वामध्ये आपणही आपले सक्रिय सहभाग व सहकार्य नोंदवावा. हि नम्र विनंती!

गुरुमाऊली प. पू. आण्णासाहेब मोरे

  • प्रमुख – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर
  • प्रमुख – श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
  • अध्यक्ष – श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट, दिंडोरी, जि.नाशिक

कृषी महोत्सव

कृषी महोत्सवाचे मुख्य विषय

६ वे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन

श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक कृषी महोत्सव २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञानासोबत सेंद्रिय शेती केल्यास कृषी क्षेत्रात खूप प्रगती होऊ शकते, असा आमचा विश्वास आहे, शेतकऱ्यांपर्यंत हे नवीन तंत्रज्ञान पोहोचविण्याचा एक प्रयत्न या महोत्सवातून सध्या केला जाणार आहे.या मुळे शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम तर होईलच, पण सोबत कृषी क्षेत्राचाही विकास होईल.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही नवीन व विकसित , अत्याधूनिक तंत्रज्ञान, खते, सेंद्रिय व नैसर्गिक खते व औषधे, नवीन उपकरणे, यंत्रे, सेंद्रिय व जैविक कृषी तंत्रज्ञान प्रत्यक्षरित्या स्टॉलच्या माध्यमांतून हजारो देश-विदेशातील कंपन्या थेट लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील.
मागील ५ वर्षातील झालेल्या जागतिक कृषी प्रदर्शनामुळे लाखो शेतकरी, विद्यार्थी, देश-विदेशातील तज्ञ, कृषी व कृषी रहित कंपन्यांना खूप फायदा झाला

भारत व कृषी संस्कृती दर्शन

भारतीय अर्थव्यवस्था हि कृषीवर आधारित आहे. भारतीयांच्या मुळ गरजा भागविण्याबरोबर सभ्यता, संस्कृती व सामाजिकतेचा उगम कृषी संस्कृतीतून झाला आहे. कृषीचा असमतोल, विषमता व ऱ्हास म्हणजे भारतीय संस्कृतीतील नीतीमूल्यांचा माणुसकीचा व सामाजिकतेचा ऱ्हास आहे. म्हणून भारतात जनजीवन सुरळीत व सुव्यवस्थित राहण्यासाठी कृषी क्षेत्राची भरभराट सर्वांगीण होणे हि काळाची गरज आहे.
जगाच्या पाठीवर भारत हा विविधतेने नटलेला एकमेव देश आहे. भारताच्या विविध प्रांतात असलेली आगळी वेगळी संस्कृती, सण-उत्सव, पेहराव, खाद्य संस्कृती, कृषीची विविध उत्पादने आदी सर्व विविधतेने नटलेली संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती होय. हि भारतीय संस्कृती अभ्यासण्यासाठी विविध प्रांतातील व देश-विदेशातील संशोधक येतात अशा विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन देखील या जागतिक कृषी महोत्सवात पाहण्यास मिळेल.

पशु व गौवंश प्रदर्शन

भारतीय कृषी शास्त्रात पशुधनास अत्यंत महत्वाचे स्थान आहे. पशुधनामुळे शेतीकार्यास मदत होऊन दुध, जैविक खते, औषधे तसेच बायोगॅस तयार करण्यासाठी उपयोग होऊन खर्चात देखील मोठी बचत होते. सध्याच्या आधुनिकीकरणाच्या काळात वेगवेगळ्या कारणाने पशुधन लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
भारतासहित देश-विदेशात गोवंशासहित विविध प्रकारच्या पशुधनाच्या जाती-प्रजाती आढळतात. भारतातील मुख्य पशुधनाच्या जाती-प्रजाती त्यांचे आजार व उपाययोजना, शासकीय योजनांची माहिती, पशुधनाशी संबंधित संबंधित असणाऱ्या संस्था, कंपन्या, तसेच दुग्धवर्धनासाठी पशुखाद्य, पशुधनासाठी उपयुक्त यंत्रसामुग्री, गायीच्या शेण – गोमूत्रापासून बनविलेले विविध औषधे, गायीचे महत्व सांगणाऱ्या विविध सेवाभावी संस्था, चाऱ्याचे विविध प्रकार आदि बाबी प्रदर्शनात पाहण्यास मिळतील.

दुर्मिळ वनऔषधी व आरोग्य प्रदर्शन

भारत हा आयुर्वेद शास्त्र आणि वनौषधीसाठी अनादी काळापासून प्रसिध्द आहे. भारतात विविध प्रांतातील आढळणाऱ्या दुर्मिळ वनस्पती प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात येत आहे. मानवी उपयोग, पशु-पक्षी, पर्यावरण, विविध आजार, निसर्गोपचार यासाठी गुणकारी वनस्पतींचा या मध्ये समावेश असणार आहे. श्रीगुरुपीठ व दिंडोरी येते ३०० पेक्षा अधिक वनस्पतींची लागवड व संवर्धन करण्यात आले आहे. वनस्पतींचे पर्यावरणदृष्ट्या, नैसर्गिक, सामाजिक व अध्यात्मिकदृष्ट्या असणारे महत्व विषद करून लोकसहभागातून कृतीशील प्रबोधन घडविण्याचे कार्य या माध्यमातून केले जात आहे. सध्याच्या वाढत्या कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब व इतर आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊनच आयुर्वेदिक, आध्यात्मिक, होमेओपॅथिक व अॅलोपॅथिक, निसर्गोपचार या विविध उपचार पद्धती व प्रशस्त सुविधांनी युक्त हॉस्पिटलची त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे उभारणी करण्यात येत आहे. कृषी महोत्सव अंतर्गत या हॉस्पिटलसाठी निधी देखील जमा करण्यात येणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या दुर्मिळ वनौषधींच्या प्रदर्शनाद्वारे आयुर्वेदिक शेती पुढे आणून त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य केले जाणार आहे.

प्राचीन भारतीय कृषी विज्ञान

प्राचीन भारतात अनाधी काळापासुन ऋषीमुनींनी विकसीत केलेले विज्ञान पारतंत्र्य व इतर कारणांमुळे लुप्त झालेल्या ज्ञानाचा आजही अनुभव ङ्मेतो. त्यात वराहमीर यांचा भूगर्भ पाणीशास्त्र तसेच पराशर, कश्यप ऋषींची कृषी विषयी अद्वीतीय माहिती, सुरपाल ऋषी यांची वृक्ष, वनस्पती याची सुक्ष्म माहीती ग्रंथांमध्ये बघावयास मिळते. याचे प्रात्यक्षीक मांडण्याचे नियोजन या कृषी महोत्सवाद्वारे केले जात आहे. या कृषी महोत्सवात अनंतकालीन माहिती तज्ञ व ग्रंथ आपल्याला बघावयास व अभ्यास करावयास सुवर्ण संधी आहे.

कृषी महोत्सवातील आकर्षण

जागतिक कृषी महोत्सव २०१७ मधील आकर्षण.
सेंद्रिय खते/औषधे
कीटकनाशके व खते
कृषी पर्यटन
पशुधन व दुग्ध व्यवस्थापन
आधुनिक कृषी अवजारे
फळे - भाजीपाला
पॉली हाऊस
रोपवाटिका
सिंचनाचे प्रकार
माती – पाणी परीक्षण
प्रक्रिया पदार्थ
कृषी वास्तुशास्त्र
कृषी ग्रंथ/CD/DVD
कृषी – कर्ज(बँका)
कृषी जोड व्यवसाय
जाहिरात
अपारंपारिक उर्जा
अवजारे

कृषी महोत्सवाची वैशिष्ट्ये

जागतिक कृषी महोत्सव २०१७ मधील आकर्षण व वैशिष्ट्ये
सामाजिक उपक्रम
कृषी विकासासाठी सेवेकरी शेतकऱ्यांनी आयोजित केलें सेवाभावी कार्यक्रम
परिसंवाद व चर्चासत्रे
विनामुल्य प्रवेश व मोफत चर्चासत्र
कृषी विविधता
महाराष्ट्रासहित भारतातील कृषी विविधता एकाच छत्राखाली
१२ बलुतेदार
१२ बलुतेदार
कृषी वास्तुशास्त्र
कृषी वास्तुशास्त्र प्रात्यक्षिक नमुना
तज्ञ वैज्ञानिक
कृषी, पशुधन व पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग
पशुधन
पशुधन व गोवंश प्रदर्शन
दुर्मिळ वनौषधी
दुर्मिळ वनौषधी व आरोग्य प्रदर्शन
कृषी शास्त्र
प्राचीन भारतीय कृषी संस्कृती दर्शन
सांस्कृतिक कार्यक्रम
प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम
कृषी विकास
शेतीसह शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास
मोफत स्टॉल
कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी व विद्यार्थी
कृषी माऊली पुरस्कार

मोफत स्टॉल : कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी व विद्यार्थी यांना डॉ. ए.पि.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती प्रीत्यर्थ कृषी माऊली पुरस्कार व मोफत स्टॉल देऊन त्यांचे संशोधन लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाविन्याशी सुवर्ण संधी

कृषी माऊली पुरस्कार : कृषी माऊली पुरस्कार कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना

सामाजिक उपक्रम : कृषी विकासासाठी सेवेकरी शेतकऱ्यांनी आयोजित केलें सेवाभावी कार्यक्रम

मोफत प्रवेश : विनामुल्य प्रवेश व मोफत चर्चासत्र

कृषी विविधता : महाराष्ट्रासहित भारतातील कृषी विविधता एकाच छत्राखाली

कृषी वास्तुशास्त्र : कृषी वास्तुशास्त्र प्रात्यक्षिक नमुना

तज्ञ वैज्ञानिक : कृषी, पशुधन व पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग

पशुधन : पशुधन व गोवंश प्रदर्शन

दुर्मिळ वनौषधी : दुर्मिळ वनौषधी व आरोग्य प्रदर्शन

कृषी शास्त्र : प्राचीन भारतीय कृषी संस्कृती दर्शन

सांस्कृतिक कार्यक्रम : प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम

कृषी विकास : शेतीसह शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास

विशेष कृषी पुरस्कार

कृषी माऊली पुरस्कार कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना
Krushi Bhushan

कृषी भूषण पुरस्कार

श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टला महाराष्ट्र शासनातर्फे सेंद्रीय शेती कृषिभूषण पुरस्कार २०१३ प्रधान करताना माननीय श्री. के.शंकरनारायणन, राज्यपाल-भारत सरकार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, व कृषीभूषण पुरस्कार स्वीकार करतांना ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. आबासाहेब मोरे व उपस्थित इतर कॅबिनेट मंत्री महोदय.

Chatrapati Shivaji Maharaj Krushi Ratna Award

छत्रपती शिवाजी महाराज कृषी-रत्न पुरस्कार

श्री आदरणीय गिरीश मोरे (आबासाहेब) यांना (श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टला) पहिले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन-२०१३ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कृषिरत्न पुरस्कार प्रधान करताना. नामदार श्री राधा कृष्ण विखे पाटील (कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य), श्री स्वामी समर्थ सेवा व् आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) प्रमुख पिठाधीश प.पु.गुरुमाउली, संमेलनाध्यक्ष रा.रं.बोराडे व इतर कृषी मान्यवर. श्री स्वामी समर्थ सेवा व् आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) अंतर्गत श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट दिंडोरी. या विस्तार्त्मक करणा-या संस्थेला सेंद्रीय शेती , सेंद्रीय गट शेती, वेलवर्गीय व दुर्मिळ वनस्पती संशोधनाचे प्रात्यक्षिक विस्तारासाठी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आदरणीय गिरीश मोरे (आबासाहेब) गेल्या १०-१२ वर्षापासून आपल्या स्वामीमय दिंडोरी नगरीत सेंद्रीय शेती , सेंद्रीय गट शेती, वेलवर्गीय व दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पती, गो संवर्धन, एक गाय एक कुटुंब, नक्षत्र वन, सेंद्रिय व सात्विक भाजिपाला उत्पादन या सर्व संशोधनाचे प्रयोगांवर नुसती चर्चा करण्यापेक्षा शेतक-यांना प्रत्यक्ष शेतीवर नेऊन त्यांची प्रत्येक्षिके दाखवण्याचे काम दिंडोरीत केले जाते.

500000+

Visitors

300+

Stalls

800+

Swayansewak

300000+

Farmers

संपर्क

खालील पत्यावर संपर्क साधा

ठिकाण

जागतिक कृषी महोत्सव २०१७,
डोंगरे वस्तीगृह मैदान, कॅनडा कॉर्नर जवळ, गंगापूर रोड
नाशिक - महाराष्ट्र- भारत
फोन: + (02557) 221610
ई-मेल: [email protected]

संपर्क - पत्ता

||प्रधान सेवा केंद्र दिंडोरी ||
श्री स्वामी समर्थ प्रधान सेवाकेंद्र, प.पू. मोरेदादा संकुल, दिंडोरी,
ता: दिंडोरी, जि: नाशिक (महाराष्ट्र – भारत)
Pin : 422 202
संपर्क: (०२५५७) २२१७१०(कार्यालय), २२१६१० (कृषीभवन)
स्टॉल बुकिंग साठी संपर्क: ९४२३५६८४१९,
E-mail:[email protected], [email protected]
www.dindoripranit.org

Facebook

App

playstore

YouTube

आयोजक / प्रायोजक

मिडिया पार्टनर / सहभाग

नाशिक पर्यटन

AKHIL BHARATIYA SHREE SWAMI SAMARTH GURUPEETH, TRIMBAKESHWAR, NASIK

श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर

श्री गुरुपीठ, श्री स्वामी समर्थ महाराजांचा भव्य दरबार, वटवृक्ष मंदिर, प्रसादालय, मोरेदादा हॉस्पिटल व सेवेकरी निवास

त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंग

तीर्थराज कुशावर्त, गंगोत्री - गंगाद्वार, ब्रम्हगिरी, संत निवृत्तीनाथ गुहा, अंजनेरी

Vani, Nashik

पंचवटी

नाशिक पंचवटी - गोदावरी नदी, काळाराम मंदिर, तपोवन

panchvati, NASIK

श्री सप्तशृंगी गड

चार मुख्य शक्तीपिठातील एक पीठ

Vani, Nashik

प्रधान केंद्र दिंडोरी

स्वामी समर्थ प्रधान केंद्र, यज्ञशाळा, मुक्त संचार गोशाळा, कृषी ई वाचनालय, मातोश्री शकुंतलाताई कृषी भवन

panchvati, NASIK

मातोश्री कृषी पर्यटन, दिंडोरी

पारंपारिक व आधुनिक कृषी अवजारे, शोभिवंत मत्स्य प्रकल्प , मसाला गार्डन, बैलगाडी सवारी, शेततळे