जानेवारी २०२४ (वर्ष १४ वे)

2024/01/24 10:00:00

प्रचार प्रसार

जागतिक कृषी महोत्सव सप्ताह २०२२

उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी – गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे

या वर्षी कोविड १९ चे सर्व नियम पाळून  कार्यक्रम घेण्यात यईल,  यामध्ये  शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बांधावर घेण्यात येणारा विशेष उपक्रम, तसेच  १० ते १५ गावातील शेतकऱ्यांसाठी मिळून  घेण्यात येणार आहे.शेतकर्‍यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेण्यात येणारा विशेष उपक्रम

  • 24 जाने. या जगभरातील सर्व दिंडोरी प्रणीत सेवा केंद्रांच्या माध्यमातुन जवळील गावात घेण्यात येणारा एकदिवसीय कृषीजागर
  • 25 ते 27 जाने. विभागीय कृषी महोत्सव आयोजन
  • कृषीशास्त्र विभागाच्या माध्यमातुन शेतकर्‍यांना विषमुक्त शेतीसाठी देशी व गावराण बियाणे, घरगुती खते-औषधे, जिवाणु कल्चर बनविण्याचे प्रात्यक्षीक प्रशिक्षण व मार्गदर्शन
  • स्वयंरोजगार विभागाअंतर्गत शेतीस पुरक जोडव्यवसाय व प्रक्रिया उद्योगांची माहीती शेतकरी गट, बचत गट मार्गदर्शन
  • विवाह संस्कार विभागाच्या माध्यमातुन शेतकर्‍यांच्या कुटूंबातील इच्छूक उपवर-वधूं -साठी मोफत नोंदणी, माहिती व मार्गदर्शन
  • भारतीय संस्कृती अस्मिता विभागातुन कृषी विषयक सण-उत्सवांची मांडणी व त्यांचे आध्यात्मिक व वैज्ञानिक माहिती
  • लाखो सबस्क्रायबर असलेल्या (Dindori Pranit Seva Marg) व (Krushi Mahotsav) युट्युब चॅनल वरून कृषी उपयोगी माहितीचे प्रक्षेपण
  • प्रयोगशील शेतकर्‍यांसाठी कृषीमाऊली सत्कार
  • केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहीती व मार्गदर्शन

सेवा मार्गातील विविध विभाग

विवाह संस्कार विभाग:

सुयोग्य वैवाहिक जोडीदार मिळवून सुखी व समाधानी जीवनासाठी विवाह संस्कार विभागाद्वारे विविध इच्छुकांना अध्यात्मिक सेवा व मार्गदर्शन केले जाते. सर्व जाती-धर्मियांसाठी मोफत नाव नोंदणी करून विवाहानुरूप अपेक्षित स्थळांची माहिती देण्यात येते. विवाहापूर्वी व विवाहतर मार्गदर्शन करून, कुलधर्म व कुलाचार विषयक मार्गदर्शन केले जाते. गर्भवती माता भगिनींना प्रसूतिपूर्व प्रसुतीपश्चात उपयुक्त संस्काराची मार्गदर्शन करण्यात येते.आदिवासी समाजासाठी विशिष्ट विवाह मंडळ. हुंडा मानपान अनिष्ट रूढी यांचे निर्मूलन इत्यादीद्वारे जनजागृती करण्यात येते. वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी हा विभाग कार्यशील आहे.
विवाह संस्कार विभागाच्या अधिक माहितीसाठी संपर्क :7755941710

पशु व गोवंश विभाग:

भारतीय पशु गोवंशाचे संवर्धन व संशोधन करून संवर्धनाविषयी सर्वांपर्यंतजनजागृती करण्याचे कार्य हा विभाग करत आहे. वैज्ञानिक व आध्यात्मिक दृष्टीने गायीचा आदर्श गोठा, गायीच्या आरोग्याविषयी चर्चासत्रे, प्रशिक्षण शिबिरे, दुर्मिळ वनौषधी, गाईंना आवश्यक आयुर्वेदिक वनस्पतीचे महत्त्व, चारा व्यवस्थापन,गुरांना उपयुक्त, हायड्रोफोनिक, मुरघास इत्यादीबद्दल डेमो मॉडेलद्वारे मार्गदर्शन, विविध पशु प्राण्यांपासून मिळणारे बाय प्रोडक्ट यांपासून पंचगव्य, शेणखत, गांडूळखत, तूप ,गोमूत्रअर्क इत्यादी. निर्मितीचे प्रशिक्षण या विभागाद्वारे दिले जाते
पशु व गोवंश विभागाच्या अधिक माहितीसाठी संपर्क :02557 221710

कृषीशास्त्र विभाग:

श्री स्वामी समर्थ सेवामार्गातील कृषीशास्त्र हा एक महत्त्वाचा विभाग असून कृषक बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना सुखी, समृद्ध व स्वावलंबी करण्यासाठी पारंपरिक शेतीला अध्यात्म व विज्ञान यांची योग्य सांगड घालून सहज सोप्या पद्धतीत प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षित केले जाते. शेतीतील विविध समस्या व शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच मनोबल वाढीसाठी राष्ट्रीय कृषी सत्संग मेळाव्यांद्वारे प्रबोधन केले जाते. जागतिक तापमान वाढ व हवामान बदलातील दुष्परिणाम टाळण्यासाठी सेंद्रिय, नैसर्गिक शेतीद्वारे जैव विविधतेची जोपासना करणे , उत्पादन खर्च कमी करण्यासाठी देशी गावरान बियाणे संवर्धन व प्रचार – प्रसार, देशी गौवंश संगोपन, घरगुती खते औषधे निर्मिती, खेड्यांकडून शहरांकडे होणारे स्थलांतर टाळण्यासाठी ग्रामीण भागात महिला सक्षमीकरण व गटशेतीद्वारे कृषिपूरक जोडव्यवसाय व प्रक्रिया निर्मिती करून बाजारपेठ उपलब्ध करणे , भौगोलिक स्थितीला अनुकूल स्थानिक पिक पद्धतीनुसार जिल्हानिहाय दिंडोरी प्रणीत आदर्श शेती मॉडल तयार करण्याचे महत्वपूर्ण कार्य या विभागातून केले जाते.आपणदेखील या विभागात सहभाग नोंदवू शकतात.
कृषीशास्त्र विभागाच्या अधिक माहितीसाठी संपर्क:7757008652

माहिती व तंत्रज्ञान विभाग:

सेवामार्गातील सर्व विभागांचे संदेश कमी वेळात सर्वांपर्यंत पोहचविणे, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून , वेबसाईट, YouTube , Social Media, फेसबुक, Telegram इत्यादींद्वारे आवश्यक ज्ञानाची देवाण – घेवाण करण्याचे कार्य माहिती व तंत्रज्ञान विभाग करीत आहे, तसेच २ लाखाहून अधिक सब्सक्रायबर असलेल्या Dindori Pranit Seva Marg या YouTube channel वरून परमपूज्य गुरुमाउलींचे हितगुज दर रविवार, गुरुवार आणि दर महिन्याच्या मासिक सत्संगाचे प्रक्षेपण प्रक्षेपित केले जाते.
संपर्क: 9922420009

भारतीय संस्कृती व अस्मिता विभाग:

सण वार – व्रत – वैकल्ये हे भारतीय संस्कृतीचे महत्वाचे अंग आहे. या विभागातून संस्कृती जोपासण्याचे हे महत्तम कार्य सेवामार्गातील माता भगिनी करीत आहेत. वर्षभरातील येणारे सर्व सण – वार – व्रत – वैकल्ये यांची भारतीय संस्कृतीप्रमाणे मांडणी पूजा कशी करावी व त्याचे अध्यात्मिक व वैज्ञानिक महत्व याबद्दल सुलभ सोप्या भाषेत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक स्वरूपात मांडणी करून असंख्य माता-भगिनी पर्यंत पोहोचवीत आहेत. कुलाचार प्रमाणे कुलदैवत कुलदेवी मानसन्मान विविध प्रकारच्या पूजा वरणारुप विविध प्रकारच्या रांगोळ्या देव्हारा देवघर कसा असावा याबद्दल मार्गदर्शन करण्याचे कार्य या विभागात प्रामुख्याने होत आहे.
भारतीय संस्कृती व अस्मिता विभाग संपर्क :02557221710

स्वयंरोजगार विभाग:

सेवामार्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची नाव – नोंदणी करून मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य हा विभाग करतो. महिला सक्षमीकरण अंतर्गत हस्तकला, पाककला, गृहउद्योग इत्यादी तसेच शेतकरी बांधवांसाठी सेवामार्गाच्या सात्विक कृषिधन निर्मिती अंतर्गत सात्विक शेतमालाची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांना कर्तृत्ववान, स्वावलंबी बनविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
स्वयंरोजगार विभागाच्या अधिक माहितीसाठी संपर्क: 7755941710

पर्यावरण प्रकृती विभाग:

या विभागात महाराष्ट्रात, परराज्यात व परदेशात लाखो प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत असून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, दुर्ग संवर्धन, जल संवर्धन, दुर्मिळ वनौषधी संशोधन इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहे. जलसंवर्धनातून नदी स्वच्छता, पाण्याची काटकसर, पुनर्भरण व पुनर्वापर उपक्रम, कचरा विनियोग व्यवस्थापन – टाकाऊ पासून टिकाऊ, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रणासाठी फटाके व डी.जे.बंदी, फटाक्यांचा वापर न करता ई – दिवाळी हि Computer software, Mobile Application द्वारे साजरी केली जाते. पर्यावरणातील विविध माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगारातून बेरोजगारांना स्वयंरोजगार दिला जातो. उदा.मातीचे गणपती, आकाशकंदील, रक्षाबंधनासाठी राखी बनविणे इ . पशु, पक्षी व प्राणी यांची माहिती व संवर्धन, अन्न नासाडी टाळून अन्नदान मोहिम, सांस्कृतिक कार्यक्रमातून पर्यावरण जनजागृती, गड – किल्ल्यांचे स्वच्छता – संवर्धन, पर्यावरण पूरक सेवा केंद्र कसे असावे यांसारख्या विविध उपक्रमातून जनजागृती व संदेश सर्वत्र पोहचविण्याचे कार्य या विभागातून होत आहे.
पर्यावरण प्रकृती विभागाच्या अधिक माहितीसाठी संपर्क: ( 02557 ) 221710,7755941721

कृषी महोत्सवातील आकर्षण

जागतिक कृषी महोत्सव मधील आकर्षण

c

कृषी पर्यटन

H

सेंद्रिय खते/औषधे

x

कीटकनाशके व खते

A

पशुधन व दुग्ध व्यवस्थापन

T

आधुनिक कृषी अवजारे

r

फळे – भाजीपाला

w

पॉली हाऊस

G

रोपवाटिका

z

सिंचनाचे प्रकार

S

माती – पाणी परीक्षण

C

प्रक्रिया पदार्थ

U

कृषी वास्तुशास्त्र

f

कृषी ग्रंथ / CD / DVD

B

कृषी – कर्ज(बँका)

h

कृषी जोड-व्यवसाय

D

जाहिरात

P

अपारंपारिक उर्जा

e

अवजारे

कृषी महोत्सवाची वैशिष्ट्ये

जागतिक कृषी महोत्सव  मधील आकर्षण व वैशिष्ट्ये

O

सामाजिक उपक्रम

कृषी विकासासाठी सेवेकरी शेतकऱ्यांनी आयोजित केलें सेवाभावी कार्यक्रम

M

परिसंवाद व चर्चासत्रे

विनामुल्य प्रवेश व मोफत चर्चासत्र

L

कृषी विविधता

महाराष्ट्रासहित भारतातील कृषी विविधता एकाच छत्राखाली

e

१२ बलुतेदार

१२ बलुतेदार

U

कृषी वास्तुशास्त्र

कृषी वास्तुशास्त्र प्रात्यक्षिक नमुना

o

तज्ञ वैज्ञानिक

कृषी, पशुधन व पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग

A

पशुधन

पशुधन व गौवंश प्रदर्शन

u

दुर्मिळ वनौषधी

दुर्मिळ वनौषधी व आरोग्य प्रदर्शन

S

कृषी शास्त्र

प्राचीन भारतीय कृषी संस्कृती दर्शन

j

सांस्कृतिक कार्यक्रम

प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम

k

कृषी विकास

शेतीसह शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास

d

“कृषी माऊली”

पुरस्कार

मोफत प्रवेश : विनामुल्य प्रवेश व मोफत चर्चासत्र
कृषी माऊली पुरस्कार : कृषी माऊली पुरस्कार कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना
सामाजिक उपक्रम : कृषी विकासासाठी सेवेकरी शेतकऱ्यांनी आयोजित केलें सेवाभावी कार्यक्रम
कृषी विविधता : महाराष्ट्रासहित भारतातील कृषी विविधता एकाच छत्राखाली(१२ बलुतेदार)
कृषी वास्तुशास्त्र : कृषी वास्तुशास्त्र प्रात्यक्षिक नमुना
तज्ञ वैज्ञानिक : कृषी, पशुधन व पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग
पशुधन : पशुधन व गौवंश प्रदर्शन
दुर्मिळ वनौषधी : दुर्मिळ वनौषधी व आरोग्य प्रदर्शन
कृषी शास्त्र : प्राचीन भारतीय कृषी संस्कृती दर्शन
सांस्कृतिक कार्यक्रम : प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम
कृषी विकास : शेतीसह शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास

विशेष पुरस्कार

कृषी, पशु-गौवंश, दुर्गसंवर्धन इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वैयक्तिक व संस्थेला मिळालेले पुरस्कार

कृषी भूषण पुरस्कार

महाराष्ट्र शासनातर्फे श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टला सेंद्रीय शेती कृषिभूषण पुरस्कार २०१३” चे वितरण तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. श्री. के.शंकरनारायणन तथा मुख्यमंत्री मा. ना. श्री. पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी-रत्न पुरस्कार

श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टने सेंद्रीय शेती, नैसर्गिक व सात्विक भाजीपाला गटशेती, वेलवर्गीय व दुर्मिळ वनस्पती इत्यादींच्या संशोधनाचे प्रात्यक्षिक व विस्तार केल्याबद्दल संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक गिरीश मोरे (आबासाहेब) यांना पहिले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन-२०१३ अंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज कृषिरत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले.

राष्ट्रीय गोकर्तुत्व पुरस्कार

श्री. गिरीश मोरे (आबासाहेब) यांना श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टला, आधार व्यवस्थापन प्रकल्पाचा “गो-कर्तुत्व पुरस्कार” देण्यात आला.

संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार

दुर्ग संवर्धन व दुर्ग अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एप्रिल २०१८ मध्ये “संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

0
+
व्हिजिटर्स
0
+
स्टॉल्स
0
+
स्वयंसेवक
0
+
शेतकरी

आयोजक

सहभाग व सहकार्य