प्रस्तावना

जानेवारी २०२१ –  जगभरात ११०० ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

मागील वर्षी कोविड १९ चे सर्व नियम पाळून जगभरात ११०० ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर घेण्यात आला ,  शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे प्रात्यक्षिकरित्या प्रशिक्षण देऊन एकमेव उद्देश असणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवात जीवामृत, अमृतजल यांसारख्या विविध सेंद्रिय खत-औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. सेंद्रिय शेती तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

 

जानेवारी २०२० – नाशिक

जागतिक कृषी मोहत्सव २०२० मध्ये बांबू लागवड, शासकीय योजनांचा लाभ, यंत्रसामग्री, उपलब्ध बाजारपेठ, तज्ञांचे मार्गदर्शन तसेच बांबूविषयी प्रात्यक्षिक देण्यात आले. सेवा मार्गाच्या स्वयंरोजगार कृषी स्वयंरोजगार महामेळावा आयोजित करण्यात आला, तसेच A2B: Agriculture to Business (कृषी ते उद्योग ) B2B : Business to Business (उद्योग ते उद्योग) B2G Business to Government (उद्योग ते शासन ).

जानेवारी २०१९ – नाशिक

दि. २५ ते २९ जानेवारी २०१९ मध्ये: अनुभवी तज्ञ, विशेषत: नेपाळ, USA, कॅनडा, दुबई इतर पाच देशासह, भारताच्या विविध राज्यातील कृषी अभ्यासक, शेतकऱ्यांची भेट. सुमारे ५००+ प्रकारच्या जतन केलेल्या गावरान देशी बी-बियाण्यांचे प्रदर्शन. संशोधनात्मक व प्रयोगशील शेतकरी विद्यार्थ्यांना मोफत स्टॉल.

एप्रिल २०१८ – नाशिक

जागतिक कृषी महोत्सवच्या २०१८ च्या कार्यक्रमात देशी बी-बियाणे प्रदर्शन हा विषय आकर्षणाचा ठरला. यामध्ये भारतातील व श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र स्थित मातोश्री शकुंतलाताई कृषीभवन शाकंभरी देशी-सिड बँक मधील शेकडो प्रकारचे विविध वाणांची माहिती, प्रदर्शन भरविण्यात आले होते. शेतकऱ्यांना माफक दरात चांगल्या दर्ज्याचे देशी बी-बियाण्यांची वाण यांची शेतकऱ्यांच्या गटातून विक्री सुद्धा करण्यात आली. देशी-बियाणे संवर्धक करणाऱ्या व्यक्तींना कृषी माऊली २०१८ या पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष चर्चासत्र सुद्धा घेण्यात आले होते ज्यामध्ये अनुभवी तज्ञांनी मार्गदर्शन केले.

जानेवारी २०१७ – नाशिक

आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती तज्ज्ञ परिषद, शिक्षक मांदियाळी, विशेष उपक्रम डाळींब परिषद, केंद्रीय आयुष विभागाचा सहभाग.

जानेवारी २०१६ – नाशिक

आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती तज्ज्ञ परिषद, सरपंच मांदियाळी, विशेष उपक्रम डाळींब परिषद, केंद्रीय आयुष विभागाचा सहभाग, विशेष उपक्रम आत्महत्यापिडीत, दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी पंचसूत्री कार्यक्रम, तसेच आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ श्री. राजेंद्र सिंह, आदर्श सरपंच श्री. पोपटराव पवार व इतर विशेष तज्ज्ञांचा मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला.

जानेवारी २०१५ – नाशिक

आंतरराष्ट्रीय सेंद्रीय तज्ञ परिषद, पर्यावरण महोत्सव, सरपंच मांदियाळी विशेष उपक्रम आणि केंद्रीय अन्नपुरवठा व केंद्रीय आयुष विभागाचा सहभाग सेंद्रीय शेतीतज्ञ श्री. रेड्डी (तामिळनाडू) आणि आदर्श सरपंच श्री. पोपटराव पवार आदी विशेष तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला.

जानेवारी २०१४ – नाशिक

अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाचे आयोजन, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतकरी, संशोधक, साहित्यिक यांचा “कृषीरत्न” पुरस्कार देऊन गौरव.

जानेवारी २०१३ – त्र्यंबकेश्वर, नाशिक

कृषी प्रदर्शनातील विशेष उपक्रमात दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना १००० ट्रक चारा व १००० लि. पाण्याच्या टाक्या मोफत वाटप, कृषी S.M.S. सेवेचे लोकार्पण करतांना प.पु.गुरुमाऊली समवेत तत्कालीन मुख्यमंत्री व ५ कॅबिनेट मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

जानेवारी २०१२ -श्रीगोंदा

अहमदनगर संस्थेमार्फत १५० शेतकऱ्यांच्या गटांची निर्मिती आणि गटशेतीच्या संगणक प्रणालीचे उद्घाटन सोहळा तत्कालीन कृषी मंत्री, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आदिवासी विकास मंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला.